धुळे शहरातील आग्रा रोडवरील अतिक्रमणावर हातोडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आंदोलन. धुळे शहरातील मुख्य रस्ता आग्रा रोड यावर असलेले वर्दळ या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी लोटगाडीधारक , व्यापारी वर्ग राहतो.या ठिकाणी एन दिवाळीच्या सणासुदी धुळे मनपा  व बांधकाम विभागाच्या अंतर्गत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने आज ४८ तासांची सवलत देत असताना देखील लगेच ताबडतोब या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात येत असल्याचे व्यापारी यांच्याकडून सांगण्यात आले .तर यासाठी व्यापारी त्याचबरोबर लोडगाडी धारकांना दिलासा देण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांनी हातगाडी चालक , व्यापारी वर्ग यांच्यासह या ठिकाणी आंदोलन केले. व या संदर्भात सदर कारवाई थांबविण्यात यावी अशी विनंती केली. व याबाबत  प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल. असा देखील इशारा दिला. यावेळी मोठ्या संख्येने अतिक्रमण निर्मूलन पथक , मनपा विभागाचे त्याचबरोबर बांधकाम विभाग, पोलीस पथक मोठ्या संख्येने ताफा घेऊन या मोहिमेत सहभागी झाले होते. तर व्यापारी , हातगाडी, व लोटगाडीधारक यांनी या ठिकाणी मोहिमेचा निषेध व्यक्त केला आहे.