महावितरणने तात्काळ नवीन खांब बसवून द्यावा नागरिकांची मांगणी.
समता नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात असलेला विद्युत खांब खाली गंजला असून तो एका बाजूने वाकला आहे. खांब जीर्ण होऊन तिथे छिद्रे पडली आहेत. नागरिकांनी त्याला एका मोठ्या सिमेंट पाईपाचा आधार दिला आहे. मात्र हा वीजखांब धोकादायक स्थितीत असल्याने हा खांब कधीही कोसळून पडू शकतो व या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक तसेच महावितरण यांच्याकडे तक्रारी केल्या असून देखील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या खांबा वरून विद्दूत वाहिनी गेल्या असून अशावेळी हा दुरवस्था झालेला विद्युत खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. याशिवाय जोराचा वारा आल्यास हा खांब पडू शकतो. त्यामुळे वीज महावितरण विभागाने लागलीच या धोकादायक विद्युत खांबाची दुरुस्ती करावी किंवा नवीन खांब बसवावा,अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पोलीस चौफेर न्युजशी बोलताना केली आहे यावेळी भागाबाई बळीराम सोनवणे, रफिक शेख, शशु सतीश पांडे, शांताबाई निकम, जरीना बाई पिंजारी, पुष्पा बाई साळुंखे, आदी नागरिक उपस्थित होते.


Social Plugin