सनी साळवे खुनातील चार आरोपींना दुहेरी जन्मठेप.



प्रशांत उर्फ सनी प्रकाश साळवे खून प्रकरणातील चार आरोपींना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर एका आरोपीला  साडे तीन वर्षाचा कारावास सुनावला. तसेच अन्य तिघे पुराव्या अभावी निर्दोष सुटले.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, चंदन नगरातील रहिवासी सनी साळवे व त्यांचा मित्र सुमेध सूर्यवंशी यांच्यावर दि.१८ एप्रिल २०१८ रोजी खुनी हल्ला करण्यात आला होता. मोटारसायकलचा कट लागला म्हणून त्यांना जितू फुलपगारे याने साथीदारांसह अडवत त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी सनी साळवे याला चाकू , गुप्तीने भोसकल्याने तो दगावला होता.तर त्यांचा मित्र व भाऊ हे देखील गंभीररित्या जखमी झाले होते. या घटनेनंतर देवपूर पोलिसांत जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे,वैभव गवळे, दादा फुलपगारे , गोपाल चौधरी, भैय्या बाविस्कर, सनी सानप, यांच्यावर भादंवि कलम ३०२,३०७,३२३,१४१,१४७,१४८,१४९ सह ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल झाला होता.


सनी साळवे मारेकऱ्यांना जन्मठेप!

सनी साळवे खून खटला हा धुळे जिल्हा न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने सर्व साक्षी , महत्वाचे पुरावे तपासून आज निकाल दिला.यांमध्ये तत्कालीन डीवायएसपी सचिन हिरे यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच फिर्यादी सागर साळवे , प्रत्यक्ष साक्षीदार सुमेध सूर्यवंशी, सौरभ साळवे, यांच्या दिशादर्शक ठरल्यात. त्यानुसार जिल्हा न्यायालय  क्र .५ चे न्यायमूर्ती डी.एम. आहेर यांनी या खटल्याचा निकाल सुनावला.यात मुख्य आरोपी जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवळे, यांना भादंवि कलम ३०२,३०७,३२३,१४७,१४८,१४९ व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोषी ठरविले. या चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. शिवाय १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी १ वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली .तर आरोपी दादा फुलपगारे हा खून व खुनाचा प्रयत्न कलमांतून निर्दोष सुटला.मात्र त्याला इतर कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली.त्यामुळे त्याला आणखी साडे तीन वर्ष कारावास भोगावा लागणार आहे. तसेच १० हजारांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची  शिक्षा भोगावी लागेल.