महाबळ परिसरातील संत गाडगेबाबा चौक, पठाण बाबा टेकडी येथे सभेची जय्यत तयारी सुरु.
उद्या वंचीत बहुजन आघाडीची सभा जळगांवात होणार असून या सभेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे सभेला संबोधित करणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने जळगाव शहरातील महाबळ परिसरातील संत गाडगेबाबा चौक, पठाण बाबा टेकडी येथे उद्या १८ डिसेंबर २०२३ रोजी ४ वाजता सत्ता संपादन भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ये संबोधित करणार असून जळगाव जिल्हा वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने सभेची जय्यत तयारी सुरु आहे. गेल्या महिना भरापासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून संपूर्ण जिल्ह्यात सभेचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून सर्व बहुजन समाज बांधवानी या सभेला उपस्थित राहावे असे आव्हाहन महानगर अध्यक्ष ललित घोगले यांनी केले आहे.

Social Plugin