साक्री तालुक्यातील विटाई गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास तत्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी. यासह विविध मागण्यासाठी सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी आझाद समाज पार्टीतर्फे धुळे शहरातील संतोषी माता चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेचे कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विटाई ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानुसार विटाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रशासकीय मान्यता द्यावी , विटाई गावातील गट नंबर कुप नंबर २३३ पैकी ५ एकर १५ गुंठे प्रत्येकी वनजमीन अनुसूचित जाती ,जमाती यांच्या नावे करावी. विटाई गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी मंजूर झालेल्या जागेलगत असलेली मुतारी योग्य ठिकाणी हलवावी.तसेच धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील विनोद वाईन्स शॉप त्वरित निळे स्थलांतरित करावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.१४ डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर १५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून विटाई ग्रामस्थ व आंबेडकर समुदायाचे विविध पक्ष , संघटनासह भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ बेमुदत आमरण उपोषण केले जाईल असा इशारा ही देण्यात आला आहे. रास्तारोको आंदोलनात आनंद लोंढे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर, मुकुंदराव शिरसाठ , समाधान झाल्टे,कुलभूषण वाघ,महेंद्र सोनवणे, व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Social Plugin