महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू.



वेतन वाढीच्या मागणी संदर्भात आरोग्य मित्रांचे काम बंद  आंदोलन सुरू करण्यात आले आहे . २०१२ पासून कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांना तुटपुंजा पगारावरती सेवा द्यावी लागत असून, याबाबत प्रशासनाने दखल घेत  कमीत कमी  २५ हजार रुपये वेतन आरोग्य मित्रांना द्यावे अशी मागणी करीत आरोग्य मित्रांनी विविध आरोग्य संघटनांच्या माध्यमातून क्यूमाईन क्लब समोर  काम बंद आंदोलन सुरू केले. अत्यंत कमी पगारावरती आरोग्य सेवा देत असताना मोठ्या अडचणीचा सामना आरोग्य सेवकांना करावा लागत असून महागाईच्या काळात  ११००० रुपयांत कुटुंब चालवणे अशक्य होत असल्यामुळे प्रशासनाने आरोग्य सेवकांना कमीत कमी २५ हजार रुपये वेतन द्यावे अशी मागणी या  आंदोलन आरोग्य सेवकांनी केली आहे. या संदर्भात प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलनास बसलेल्या आरोग्य सेवकांनी घोषणाबाजी देखील केल्याचे बघावयास मिळाले यावेळी किरण ढमढेरे, संदीप माळी, महेश सासले, रमेश बैसाणे, अरुण ढीवरे, सुनीता पाटील, अश्विनी चव्हाण आदी उपस्थित होते.