नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांनी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प सादर केला.या अर्थसंकल्पात धुळे शहर मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी १०३ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली असून यासाठी धुळे शहराचे आ.फारुख शाह यांनी विशेष प्रयत्न केले.
अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेली धुळे शहर मतदार संघातील कामे पुढीलप्रमाणे स्टेडीअम ते वलवाडी पर्यंत रस्ता दुभाजकासह चौपदरीकरण करणे ८ कोटी.भीमनगर ते निखील सिमेंट पर्यंत रस्ता सुधारणा करणे.- ६.५ कोटी,साक्री रोड एस.आर.पी.एफ.पंप ते सुरत बायपास रस्ता करणे- ७.५ कोटी,चितोड नाका ते बायपास रोड पर्यंत रस्ता करणे १२ कोटी,एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालय ते हाय वे पर्यंत बिलाडी रोड ५ कोटी,उर्वरित वडजाई रोड कॉक्रीटीकरणव दुभाजक करणे,पथदिवे, ५ कोटी कोटी,आग्रारोड ते वडजाई पर्यंत रस्ता करणे३.५ कोटी,तसेच श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे ग्रंथालय इमारत,धीबी घाट,मुख्य इमारत व शवविच्छेदन ईमारतीसाठी ५ लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे- १५.३० कोटी,जुने सिव्हील जिल्हा रुग्णालय येथील १०० खाटांच्या स्त्री व बाल रुग्णालयाची दुरुस्ती करणे- ९.६४ ,धुळे शहरात आदिवासी मुलांचे वसतिगृह बांधणे १३.७५ कोटी.
लवकरच या कामांचे प्रस्ताव तयार करून कामांची सुरुवात करण्यात येईल.शहराच्या विकासासाठी भरीव तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,अर्थमंत्री ना.अजित पवार यांचे शहरातील तमाम नागरिकांच्या वतीने आभार.

Social Plugin