आपल्या विविध मागण्यासाठी धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानदार आणि केरोसीन परवाना धारकांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात धुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेने ग्रामीण तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्य आणि केंद्राच्या जबाबदारीनुसार फेब्रुवारी २०२० मध्ये लागू असलेला विश्व खाद्य कारखाना लागू करावा पॉस मशिनला  पर्यायी व्यवस्था करावी धान्य वाटपाचे कमिशन तुटपुंजे असून तेही वेळेवर मिळत नसल्याने मानधन देण्यात यावे.धान्य हे दुकानदारांना द्वारपोच योजनेद्वारे मिळावे. वाधवा आयोगाच्या अहवालानुसार रेशन  दुकानदारांना शहरी भागात ५० हजार व ग्रामीण भागात ३० मासिक मानधन द्यावे, केशरी कार्ड  धारकांना अन्नधान्याचा लाभ द्यावा. प्रत्येक ५० किलो  वजनामध्ये अर्धा किलो घट ग्राह्य धरावी, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे  घरभाडे, दिवाळी बोनस मिळावा. सरकारकडून रेशन दुकानदार व  त्यांच्या कुटुंबीयांना विमा संरक्षण  मिळावे .या मागण्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील , तालुकाध्यक्ष विलास पाटील यांनी म्हटले आहे.