मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे आज मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे- पाटील यांना मराठा आरक्षणाचा अध्यादेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे राज्यभरात स्वागत करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर धुळे शहरात देखील शिवसेना जिल्हा प्रमुख सतिष महाले यांच्या नेतृत्वात धुळे मनपा इमारती समोर फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करतात आला. दरम्यान आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती असल्याने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या अनेक दिवसापासून आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होते. यावर सुयोग्य असा निर्णय घेवून कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा अध्यादेश जरांगे पाटलांच्या हातात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे आज दिला. या निमित्त जिल्हाप्रमुख सतिष महालेंच्या नेतृत्वात धुळे जिल्हा शिवसेनेमार्फत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सतिष महाले , महानगरप्रमुख संजय गुजराथी ,माजी नगरसेवक राजूनाना चौधरी, धीरज मोकळे, पंकज चौधरी, प्रसार रघुवंशी, विश्वजीत चौगुले, प्रसाद महाले, सोनू पाटील, पवन मराठे,चेतन जाधव, कल्पेश मेकले , पवन जाधव, धीरज काळे ,मनोज नरवाडे, दिनेश सिंघल दीप,विक्की खंदळे, शुभम चौधरी, चेतन पावरा, अनिकेत ठाकूर, चेतन माळी ,अभी केदार, रोहित गोपाळ, नितीन मोरे, रोहित गोसावी, राकेश कोळी,मयूर पगारे, रमेश विश्वकर्मा , दादू जोशी, रोहित गोसावी,आविनाश बोरसे, विकास सोनवणे, यांचे सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


Social Plugin