धुळे शहरातील मुलभूत सुविधा जसे रस्ते,गटारी,पाण्याची पाईप लाईन यासाठी आजपर्यंत लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरीकांचे हाल होत होते. त्या सगळ्या गोष्टींचा आ. फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाही. गटारी नाही,पाईप लाईन नाही. यासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे. शहराच्या कॉलनी भागात असलेल्या शास्त्री नगर, नवजीवन ब्लड बँक परिसरातील नागरिकांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी २५ लक्ष चा निधी आ.फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आला. शास्त्री नगर, नवजीवन ब्लड बँक परिसरात येथे संपन्न झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी राजेंद्र गर्दे,राजेंद्र चितोडकर,बलराज नेरकर,प्रमोद पाटकर,खैरनार सर,संजय ढगे,रमेश वाघ,पी.एस. बडगुजर,मगन कांबळे,नरेंद्र जगताप,संध्या वाघ,विजया गोरे,मनीषा पाटकर,रत्ना लोहार,आसिफ शाह,हारूण खाटीक,वसिम पिंजारी, सउद आलम, उपस्थित होते.


Social Plugin