संपूर्ण राज्यभरामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या शैक्षणिक मदत कक्षाच्या माध्यमातून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत पुरवण्याच मोठं काम हे केलं जात आहे, आणि त्यासाठी राज्य सरचिटणीस तथा शैक्षणिक मदत कक्षाचे प्रमुख चेतन कात्रे यांचा धुळे दौरा आज पार पडला आहे,
धुळे शहरातील चाळीसगाव रोड येथील व्हाईस ऑफ मिडिया कार्यालयात चेतन कात्रे यांच्या उपस्थितीमध्ये शैक्षणिक मदत पुरवण्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती, या बैठकीदरम्यान साक्री, शिरपूर, शिंदखेडा, त्याचबरोबर धुळे तालुका व धुळे शहरात शैक्षणिक मदत पुरवण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आले असून, या सर्व पदाधिकाऱ्यांना आपापल्या नियुक्त तालुक्यामध्ये शैक्षणिक मदत व्हाईस ऑफ मीडियाच्या कक्षामार्फत पुरवण्यासाठी कशाप्रकारे पुढील कामकाज करायचे आहे, याची महत्त्वपूर्ण माहिती चेतन कात्रे यांनी बैठकीतून दिली आहे, या बैठकीसाठी व्हाईस ऑफ इंडियाचे धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांच्यासह धुळे शहर अध्यक्ष सोपान देसले तसेच धुळे तालुका अध्यक्ष संदीप निरभवणे त्याचबरोबर राहुल सिसोडे,राजेंद्र देवरे, अनिल वाघ, उपस्थित होते.


Social Plugin