डॉ बाबासाहेब आंबेडकर जळगाव शहर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे महत्वाच्या बैठकीचे आयोजन



27 फेब्रुवारी मंगळवारी पद्मालंय शासकीय विश्राम गृह येथे सायंकाळी 5 वाजता बैठक होणार . 



विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जळगाव शहर उत्सव समितीतर्फे, 27 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील पद्मालंय शासकीय विश्राम गृह येथे, सायंकाळी 5 वाजता महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकित नवीन कार्यकारणी संदर्भात चर्चा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जळगाव शहर उत्सव समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. तरी सर्व समाज बांधवानी याची नोंद घ्यावी व बैठकीस उपस्थित रहावे. असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक मुकुंद सपकाळे, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे, माजी नगरसेवक राजू मोरे, दिलीप अहिरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जळगाव शहर उत्सव समिती अध्यक्ष सतीश गायकवाड, यांनी केले आहे.