नशिराबाद येथे प्रथमच शिव जन्म ते शिवराज्याभिषेक महानाट्य होणार.

 



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंतचा इतिहास महानाट्यातुन सादर करण्यासाठी शिव सह्याद्री प्रतिष्ठान नशिराबाद, अखिल भारतीय सकल मराठा समाज,  आणि मराठा पंच मंडळ नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे प्रथमच शिव जन्म ते शिवराज्याभिषेक महानाट्य कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे. महानाट्य संकल्पना आणि दिग्दर्शन शुभदा नेवे यांची असून सादरकर्ते श्री गणेश चव्हाण संस्थापक अध्यक्ष शिव सह्याद्री प्रतिष्ठान व अखिल भारतीय सकल मराठा समाज,

श्री हेमंत मराठे, अध्यक्ष मराठापंच मंडळ श्री महेंद्र मराठे उपाध्यक्ष मराठा पंच मंडळ, हे असणार असून विशेष मार्गदर्शन डॉ श्री प्रमोद आमोदकर, श्री बापू दादा शिंदे, सौ सोनाली गणेश चव्हाण, 

प्रेरणा -शिवरत्न तसे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आदरणीय दादा नेवे यांचे असणार आहे. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सोमनाथ भाऊ मराठे सभापती सार्वजनिक परिवहन समिती सुरत महानगरपालिका तथा अध्यक्ष अखिल भारतीय मराठा समाज हे असणार आहेत. याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय यासह विविध क्षेत्रातील तसेच विशेष प्रशासकीय अधिकारी अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

 या महानाट्यात शिव जन्मोत्सव, बालपण ,तरुण पण, राजेंचे कार्य व कामगिरी तसेच राजेंचे  कारकिर्दीतील थोरपण व महानपण, शिवराज्याभिषेक गीत , संगीत, पोवाडा, नाट्य, नृत्य असे  विविध कार्यक्रम होणार असून यात जवळपास 148 स्थानिक व जळगांवच्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे


     या कार्यक्रमांमध्ये शहरातील व परिसरातील सर्व स्त्री पुरुष, तरुणांना , विद्यार्थ्यांना , नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी रविवार हा सुट्टीचा दिवस निवडून वार व वेळाचे देखील नियोजन केले गेले आहे


हा कार्यक्रम 25 फेब्रुवारी 2024  रविवार रोजी 

वेळ - संध्याकाळी  6 वा ठिकाण आठवडे बाजार ,खालची आळी ,नशिराबाद ता. जि जळगाव या ठिकाणी आयोजित केला गेलेला असून सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष भव्य दिव्य व सुंदर अशा कार्यक्रमास सहभागी व्हावे असे आवाहन शिव सह्याद्री प्रतिष्ठान, नशिराबाद  अ.भा. सकल  मराठा समाज यांनी  केले आहे.