धुळे शहरातील धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्र समोरील एसटी महामंडळ धुळे विभागीय कार्यालयासमोर आजपासून आंदोलन सुरू असून यात प्रामुख्याने रा. प कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात संघटनेसोबत १९/०९/२०२३ रोजी झालेल्या बैठकीत १५ दिवसात निर्णय घेऊन प्रश्न सोडवण्याचे मान्य केले. मात्र झालेल्या चर्चेतील मान्य केलेल्या कोणत्याच मागण्याची दखल शासनाने न घेतलेल्या निषेधार्थ महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने दिनांक १३/०२/२०२४ पासून बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येत असून. मागण्यांमध्ये १.सन २०१८ पासून महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी, २.एप्रिल २०१६ ते ऑक्टोंबर २०२१ ची वेतन वाढ ची थकबाकी द्यावी.३ माहे एप्रिल २०१६ ते ऑक्टोंबरच्या २०२१ घर भाडे भत्ता थकबाकी त्वरित द्यावी.
४.मूळ वेतनात जाहीर केलेले रुपये २५००,४०००,५००० मुळे झालेल्या सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तपावती दूर करून सरसकट ५००० रुपये वाढ देण्यात यावी.५.रा.प कामगारांना शासकीय कर्मचारी एवढे वेतन मिळवण्यासाठी सातवे वेतन आयोग लागू करावा.६.सन २०१६- २०२० च्या करारातील एकतर्फी वेतन वाढ मधील ४८४९ कोटी मधील शिल्लक रक्कम मूळ वेतनात समाविष्ट करावे.७. गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्त्यास द्यावा.८.वैद्यकीय बिलाच्या प्रतीपुजी ऐवजी कॅशलेस योजना अमलात आणावी.९.अपहार प्रकरण बदल्या त्वरित रद्द करावे.१०.स्व मालकीच्या रा. प बस खरेदी कराव्या .११. सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कामगारांना निवृत्तीवेतनासाठी येणाऱ्या दूर करा.१२.कामगारांना व त्यांच्या कुटंबियांना सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये येण्या जाण्यासाठी एक वर्षाचा मोफत पास देण्यात यावा.१३. सेवानिवृत्तीच्या देय रक्कम तात्काळ देण्यात याव्या. या सह अनेक कामगार प्रलंबित प्रश्नांसाठी धुळे विभागातून विभागीय अध्यक्ष दीपक पांडव, विभागीय सचिव संतोष वाडीले, विभागीय खजिनदार दिलीप राजपूत, विभागीय कार्याध्यक्ष संजय परदेशी , धुळे आगाराचे अध्यक्ष जितू पाटील, आगार सचिव आर के महाजन, सौ.प्रमिला दीक्षित , सौ.आर.आर पाटील, सपना चौधरी,नीलिमा नेतकर, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर देवरे,विश्वास भोई, व्ही एस पाटील, विजय मुंदडा, के आर शेख, आर आर पाटील,मयूर शिवदे,राजेंद्र पवार, शरीफ मंसूरी, राजू चौधरी, साहेबराव सोनवणे ,गणेश मराठे, शकील पिंजारी,अशोक देवरे, भारती सोनार,विजय जाधव, दिलीप नन्नवरे, गजमल बहिरम,के.एम गर्देरे, पोपटराव चौधरी आदी सहभागी झाले आहेत.

Social Plugin