20 फेब्रुवारी पर्यंत विनोद वाईन शॉप बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडणार; आंबेडकरी अनुयायांचा इशारा...

 





धुळे शहरातील शहर पोलीस ठाणे नजीक असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागील बाजूस असलेले मद्य विक्रीचे दुकान हटवण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी गेल्या महिन्यापासून चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. हे वाईन शॉप हटवण्यासाठी अनेक निदर्शने, रास्ता रोको व जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप पर्यंत कुठलाही ठोस निर्णय या वाईन शॉप संदर्भात झालेला नाही.


धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका पाठीमागे असलेल्या विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून अनेक निदर्शने आंदोलने करण्यात आली. यानंतर या आंदोलनाची धुळे जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग घेऊन हे वाईन शॉप 10 दिवसांच्या आत हटवण्याच्या सूचना मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र अद्याप पर्यंत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने आंबेडकर समाज पुन्हा आक्रमक झाला आहे.


आज धुळे शहरातील तमाम युवक आंबेडकरी अनुयायांच्या वतीने धुके जिल्हा प्रशासनाकडे पुन्हा मागणी करण्यात आली आहे की, येत्या 20 जानेवारी पर्यंत जर वाईन शॉप स्थलांतराचा तात्काळ निर्णय झाला नाही तर आंबेडकरी समाजाच्या भावनांचा उद्रेक होईल आणि या उद्रेकांमधून मोठं जन आंदोलन उभं केलं जाईल याची प्रशासनाने दखल घ्यावी. म्हणून आंबेडकरी समाजाच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ हे वाईन शॉप स्थलांतर करण्यासाठी ठोस पावले उचलावी अन्यथा या वाईन शॉप विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल अशी संतप्त भावना आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी वाईन शॉप समितीचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक नागसेन बागुल, शंकर खरात, किरण गायकवाड, विशाल पगारे, राहुल पवार, सिद्धार्थ वाघ, बॉबी नागमल, योगेश पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.