म्हसावद- बाबा नगर येथील महिलांच्या शौचालयाजवळ असलेला अवैध जुगार अड्डा कधी बंद होणार ? परिसरातील नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा.

 



जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील बाबा नगर येथे अवैध जुगार अड्डा सुरु असून, तरुण पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे. हा जुगार अड्डा कधी बंद होईल अशी चर्चा आता गावात होत आहे.  

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा जुगार अड्डा  दोन ते तीन दिवसांपासून नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबा नगर परिसरातील या जुगार अड्ड्यावर गावातील 17 ते 24 वर्षातील तरुण मुलांची वर्दळ वाढलेली आहे, त्यामुळे शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम या जुगार अड्डा चालकाकडून केले जातं आहे. याच बरोबर जवळच महिलांचे शौचालय असल्याने महिलाना देखील हा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित जुगार अड्डा चालकाला हा जुगार अड्डा बंद करण्या संदर्भात कोणी बोलले तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातं असल्याची  माहिती नावन सांगण्याच्या अटीवर एका नागरिकाने दिली आहे. दरम्यान हा जुगार अड्डा बंद होईल का अशी दबक्या आवाजात चर्चा होत आहे. पोलिस प्रशासन काय दखल घेते यावर आता म्हसावद येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे.