बहुजन रयतेचे राजे आणि अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९४ वी जयंती आहे. संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले असून धुळ्यात सामाजिक एकतेचा संदेश देत आंबेडकरी अनुयायांनी भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोष साजरी करण्यात येत आहे त्यात धुळे शहरातील आंबेडकरी तरुण अनुयायांनी एकत्र येत भव्य अशी बाईक रॅली काढली ही बाईक रॅली समाजामध्ये एकतेचा संदेश देत समाजामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्तींना दूर करण्यासाठी दोन समाजामध्ये कायम एकोपा निर्माण व्हावा या उद्देशाने काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
ही बाईक रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून निघत शहरातील अनेक चौका चौकांमध्ये पोहोचली व प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यानंतर ही रॅली धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ येऊन या ठिकाणी आंबेडकरी युवा अनुयायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि या बाईक रॅलीची सांगता करण्यात आली. या बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी अथक परिश्रम घेतले होते.

Social Plugin