सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे या प्रशासकीय इमारतीचे सुमारे सात करोड रुपये कामाच्या शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले. आ.फारुख शाह यांच्या धुळे शहरातील विकास या हेतूने शहराच्या विकासासाठी मूलभूत सुविधांसाठी करोडो रुपयांच्या निधी आणून विकासकरण्यात आला तसेच धुळे शहर शहरात अनेक प्रशासकीय इमारती या भाड्याच्या जागेवर होते तसेच त्यांना पुरेशी जागा नसल्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या या समस्या बघून आ.फारुख शाह यांनी धुळे शहरातील प्रशासकीय इमारत साठी आरटीओ कार्यालय, आदिवासी प्रकल्प कार्यालय ,हिरे मेडिकल कॉलेजच्या इमारती ,औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत व प्रस्तावित प्रशासकीय इमारतीसाठी करोडो रुपयांच्या निधी मंजूर करून आणलेला आहे त्याच्यात एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अर्थसंकल्प अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचेकार्यालयासाठीसाठी सात कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. त्याचा शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले.आजपर्यंत धुळे शहराच्या इतिहासात आ.फारुख शाह यांनी प्रशासकीय इमारतीसाठी जो निधी आणलेला आहे तो कोणत्याच आमदारांनी आणलेला नसून यासाठी धुळे शहरातील नागरिकांनी आ.फारुख शाह यांचे आभार मानलेले आहे लवकरच धुळे शहरात एक भव्य अशी सर्व विभागासाठी प्रशासकीय इमारत प्रस्तावित असून त्याचे सुद्धा बांधकाम लवकरच सुरू होणार आहे या कार्यक्रमात आ.शाह यांचेसोबत रवींद्र पाटील कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,राहुल पाटील कनिष्ठ अभियंता,भिखन शाह,आसिफ शाह,कैलास गर्दे,माजी नगरसेवक नासिर पठाण,माजी नगरसेवक आमिर पठाण,डॉ. दीपश्री नाईक,प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह,हारूण खाटीक,डॉ.बापुराव पवार, इंजी. अफसर शाह,शादाब खाटीक,शाहरुख शाह,समीर शाह आदी उपस्थित होते.


Social Plugin