मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे महारक्तदान शिबिर.




शिवसेनेचे प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतिष महाले यांच्या वतीने शहरातील जेल रोडवरील क्यूमाईन क्लबजवळ महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी  सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संपर्कप्रमुख प्रसाद ढोमसे, डॉ. तुळशीराम गावित, विशाल देसले, संजय गुजराथी,पंकज मराठे,यांच्यासह धुळे शहर व शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात १५०० पेक्षा जास्तीचे रक्तदान झाले या ठिकाणी रक्तदात्यांना स्मार्ट वॉच किंवा ईअरबर्ड्स यापैकी एक भेट वस्तू देण्यात आली.