एमाआयडीसी पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पोलीस ठाण्यातील महिला अंमलदारांनी पोलीस ठाण्याचे कामकाज बघितले. पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून म.पो.हे. कॉ. निलोफर सय्यद यांनी काम पाहिले तसेच म.पो.हे. कॉ. तडवी यांनी दुय्यम अधिकारी म्हणून कामकाज बघितले म.पो.हे.कॉ. सुनंदा तेली यांनी ठाणे अंमलदार म्हणून काम केले तर म.पो.कॉ. सपना येरगुंटला यांनी सिसिटीएनएस चे कामकाज बघितले म.पो.कॉ. हसीना तडवी यांनी ऑफिस हजर चे काम केले. पोलीस स्टेशन ला सफाई काम करणाऱ्या महिला लीलाबाई म्हस्के, निर्मलाबाई तायडे बनाबाई जाधव व महिला अंमलदार यांचा मा. पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सत्कार केला.

Social Plugin