धुळे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार मा. डॉ. सुभाष भामरे दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, यावेळी महायुतीच्या वतीने प्रचंड रॅलीचे आयोजन करण्यासंबंधी महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या समन्वयाची बैठक 'भाजपा धुळे महानगर लोकसभा प्रचार कार्यालय' येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुतीच्या सर्व मान्यवर नेत्यांनी डॉक्टर भामरे यांच्या समर्थनार्थ निघणाऱ्या 'महारॅली' ला प्रचंड जनसमुदाय एकत्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. व संपूर्ण धुळे महानगर महायुती मय करणार असल्याचे प्रतिपादन केले.
या बैठकीला मार्गदर्शन करताना महायुतीचे उमेदवार डॉ बाबासो भामरे यांनी सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले की आपण केलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन केले जाईल .
तसेच रॅलीला उपस्थित नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. विविध वाद्य वाजंत्री ध्वनिषेपकांवरून दिला जाणाऱ्या महायुतीच्या घोषणांचा निनादात व महानगर व जिल्हा भरातून येणाऱ्या हजारो समर्थकांसह ही रॅली मोठ्या प्रमाणावर यशस्वी करून जबरदस्त शक्ती प्रदर्शन केले जाईल. याची मी ग्वाही देतो असेही डॉक्टर भामरे म्हणाले, या समन्वयाच्या बैठकीचे सूत्रसंचालन माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले, व उपस्थित सर्व घटक पक्षांचा प्रमुखांनी आपल्या सूचना दिल्या.
या प्रसंगी महायुती चे अधिकृत उमेद्वार खासदार डॉ सुभाष भामरे,भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख राजवर्धन कदमबांडे,भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर,शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे,सतीश महाले, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित,शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्हे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कैलास चौधरी, सत्यजित सिसोदे, ज्ञानेश्वर पाटील, जयाताई साळुंखे, संजय जगतापआर पी आई जिल्हाप्रमुख शशिकांत वाघ, महेंद्रजी निळे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब कदम,मनसे जिल्हाप्रमुख संजय सोनावणे,एल जे पी उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप साळवे,माजी महापौर चंद्रकांत सोनार,प्रतिभा ताई चौधरी,भाजपा प्रदेश सदस्य डॉ माधुरीताई बोरसे,शोभाताई चौहान,ज्ञानेश्वर पाटील, सुरेश अहिरे,संजय जगताप,कुंदन खरात,मधुकर चौहान,राजूबाबा शिरसाठ,सुमित पवार, संध्याताई पाटील,भाजपा संघटन सरचिटणीस जितेंद्र शहा,ओमप्रकाश खंडेलवाल,यशवंत येवलेकर,चेतन मांडोरे,संदीप बईसाने,जिल्हा प्रवक्ते शाम पाटील,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, पंकज धात्रक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवा मोर्चा अध्यक्ष सुमित पवार,महिला मोर्चा अध्यक्ष वैशालीताई शिरसाठ,सोशाल मिडिया प्रमुख पवन जाजू,महायुती कार्यालय प्रमुख विजय नाना पाच्छापूरकर उपस्थित होते.


Social Plugin