लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जवान किसान पार्टीचे अधिकृत उमेदवार नामदेव येळवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटले की , गेल्या दहा वर्षात भाजपाने कुठल्याही विकास कामे केली नाही.यासाठी माझी उमेदवारी असून शेतकऱ्यांसाठी शेती मालाला भाव ,कर्ज माफी ,वीज मोफत , समृद्ध सक्षम शेतकरी, चांगले शिक्षण, व जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र घरपोच मिळेल. स्वास्थ रोजगार , सुरक्षा तसेच देशाचा सैनिक व पॅरा मिलिटरी जवानांचे मजबुतीकरण, सर्व जवानांना वन रँक, वन पेन्शन , अग्निवीर जवानांचा सेवेचा कार्यकाळ २० वर्ष करून पेन्शन योजना लागू करणे,पॅरा मिलिटरी जवानांची २००४ पासून पेन्शन लागू करणे , पॅरामिलिटरी सैनिक कल्याण बोर्डची प्रत्येक जिल्ह्यात स्थापना करणे,विर मरण आल्यास शहीद दर्जा देणे, सैनिक व अर्ध सैनिक मधील तफावत दूर करणे,सैनिक व अर्ध सैनिकांवर होणारा अन्याय आणि जनतेवर होणारा अन्याय,अत्याचार,दुराचार, भ्रष्टाचार ,बलात्कार ,सारख्या होणाऱ्या घटनांवर २४ तासात निवारण करणे असा घटक प्रश्नासाठी अहोरात्र प्रयत्नशील रहील.असे उमेदवार पत्रकार परिषदेत नामदेव येळवे यांनी शहरातील वीर सावरकर मार्ग आपला महाराष्ट्र शेजारी असलेल्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात माहिती दिली.


Social Plugin