समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे रा.कॉ.अजित पवार सा.न्या वि. जळगांव महानगर अध्यक्ष जितेंद्र अरुण चांगरे यांचे आव्हाहन.
भाजपचे माजी नगरसेवक,तसेच महाराष्ट्र राज्य मेहतर वाल्मीकी समाज बावनी पंचायतचे अध्यक्ष संतोष मोहन बारसे, व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांची 29 मे 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली असून, इतर आरोपीना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. या फरार आरोपीना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून, बारसे कुटुंबियांना न्याय द्यावा. या मांगणीसाठी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून उद्या 6 जून 2024 रोजी 11 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हाहन
रा.कॉ. अजित पवार सा.न्या.वि. जळगांव महानगर अद्यक्ष, शिवसुगंध मेहतर वाल्मीकि समाज बहुउद्देशीय संस्था अद्यक्ष जितेंद्र अरुण चांगरे यांनी केले आहे.


Social Plugin