धुळ्यातील अग्रवाल विश्राम भवनात ७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान .




विविध स्वयंसेवी संघटनांनी संयुक्त रित्या अग्रवाल विश्राम भवनात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात, तळपत्या उन्हात ७१ रक्त दात्यांनी रक्तदान केले.



शासकीय रुग्णालयात भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता , अग्रवाल समाज , गोशाळा योग शाखा, श्रम प्रतिष्ठा गुण गौरव समिती , धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन,रोटरी क्लब ,आणि हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत रक्तपेढी च्या वतीने , अग्रवाल विश्राम भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अग्रवाल समाजाचे अध्यक्ष योगगुरू डॉ. जगदीश गिदोडिया यांच्यासह ७१ रक्त दात्यांनी या शिबिरात रक्तदान करून राष्ट्रीय उपक्रमास सहयोग दिला .हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ .पाठक, हिरे मेडिकल कॉलेज ब्लड बँक प्रमुख   डॉ.सुनिल चव्हाण ,जिल्हा शल्य  चिकीत्सक डॉ. दत्ता देगावकर , आर एम  ओ  डॉ. रवी सोनवणे, स्वप्निल पाटील, राजकुमार सूर्यवंशी,डॉ राजेश ओसवाल , आदीच्या हस्ते रक्तदात्यांना व रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. सर्वश्री अग्रवाल समाज सर्व पदाधिकारी, अग्रवाल समाज सगळे आदरणीय सदस्य, अभिषेक अग्रवाल आणि अग्रवाल युथ क्लब मेंबर्स,सौ भारती सिंघानिया आणि अग्रवाल  महिला मंडळ दिनेश अग्रवाल आणि अग्रवाल मेडिकल सेल , कैलासजी अग्रवाल आणि  अग्रवाल सहायक मंडळ,माजी आमदार प्रा.शरद पाटील, जिल्हा शिवसेना प्रसुख अतुल सोनवणे , धन्वंतरी मेडिकल फौडेशनच्या  सचिव डॉ.संगीता गिदोडीया , तामथरे येथील , श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर  संस्थानचे  अध्यक्ष ह.भ. प .महेंद्र महाराज , गायत्री परिवाराचे सुधाकर बेंद्रे, निसर्ग समितीचे एच ए पाटील, वाटर योगा ग्रुपचे पंढरीनाथ चित्ते, हंसराज अबा पाटील, मोहनजी माहेश्वरी , आणि डोंगरे महाराज कॉलनी ग्रुप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.