धुळे खरेदी विक्री सोसा.निवडणूकीसाठी जवाहर शेतकरी पॅनलचा प्रचार शुभारंभ.

 







धुळे- जवाहर गट आणि महाविकास आघाडी हा एकच परिवार आहे. खरेदी विक्री धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीच्या लि.च्या निवडणूकित सक्षम पॅनल दिले आहे. कोणीही नाराज न होता प्रत्येक कार्यकर्त्याला भविष्यात न्याय दिला जाईल. त्यामुळे मतदारांनी आणि जनतेने जवाहर शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना आर्शिवाद देऊन प्रचंड मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी आज रोकडोबा मंदिर आर्वी ता.धुळे येथे केले. धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीच्या लि.च्या निवडणूकीच्या प्रचाराचा जवाहर शेतकरी विकास पॅनलचा शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीच्या लि.च्या निवडणूकीसाठी जवाहर  शेतकरी विकास पॅनलचा आज रविवार दि.30 जून रोजी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्याकरीता आर्वी ता.धुळे येथील रोकडोबा मंदिर येथे नारळ वाढविण्यात आला. यावेळी प्रारंभी जवाहर शेतकरी विकास पॅनलचा सर्व उमेदवारांच परिचय करुन देण्यात आला. याप्रसंगी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, धुळे जिल्हयात जवाहर गट आणि महाविकास हा एक परिवार आहे. त्यामुळे जनता व कार्यकर्त्यांच्या साथीने ताकद वाढली आहे. महाराष्ट्रातील राजकिय वातावरण आता बदलले आहे. त्यामुळे येत्या विधानसा निवडणूकित राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. त्यासाठी धुळे तालुक्यात कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी नाराज न होता संघटीतपणे काम करावे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी सांगितले. प्रचार शुभारंभाप्रसंगी शिवसेना(उबाठा) नेते महेशभाऊ मिस्त्री यांनी सांगितले कि, विरोधक विरोधाला विरोध करुन राजकारण करीत आहेत, पैसा आणि इतर कोणत्याही अमिषाला बळी पडी नका, मतदार तसेच जनतेवर आमचा विश्‍वास आहे. त्यामुळे विश्‍वास गमवू नका, आ.कुणाल पाटील यांनी दिलेल्या पॅनलमागे खंबीरपणे उभे रहा विजय आपलाच असल्याचा विश्‍वास श्री महेशभाऊ मिस्त्री यांनी व्यक्त केला. याप्रसंगी धुळे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ.कुणाल पाटील यांच्यासोबत महेश मिस्त्री, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे,माजी पं.स.सभापती भगवान गर्दे, साहेबराव खैरनार,खरेदी विक्री चेअरमन लहू पाटील, सरपंच नागेश देवरे,नानाभाऊ शिंदे,दिलीप देसले, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद बच्छाव,भानुदास माळी,संतोष राजपूत, गोकुळसिंग राजपूत,अरुण पाटील,सी.यु.पाटील, संचालक विशाल सैंदाणे,भटू चौधरी, संतोष पाटील, प्रविण सोनवणे,प्रमोद पाटील, पं.स.सदस्य दिपक कोतेकर,मन्साराम पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील,डॉ. संदीप पाटील,साहेबराव पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, राजीव पाटील,हर्षल साळुंके यांच्यासह जवाहर शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.