धुळे - धुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे मार्ग व पूल अंतर्गत धुळे चितोड नाका ते सुरत बायपास पर्यंत रस्ता रुंदीकरणासह सुधारणे करणे या कामाचा 88 लाख रुपये कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले या भागात चित्तोडनाका ते सुरत बायपास पर्यंत अनेक कॉलनी मधील नागरिकांनी आ.फारुख शाह यांच्याकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली होती की चितोड नाका ते सुरत बायपास पर्यंतचे रस्त्याची व्यवस्था फार बिकट झालेली असून या रस्ता चितोड गावाला व रावेर गावाला जोडणारा असून वरदडीच्या आहे परंतु अनेक वर्षापासून हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे मोठे ठिकाणी मोठमोठे खड्डे झाल्यामुळे या भागातील व ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच या भागात हा रस्ता धुळे शहराला जुळणारा असून या रस्त्यामुळे अनेक लोकांना त्रास होत होता त्यामुळे आ.फारुख शाहयांच्या काम बघून या भागातील नागरिकांनी नियोजनाद्वारे मागणी केली होती की हा रस्ता तात्काळ व्हायला पाहिजे याबाबत आ.फारुख शाह यांनी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी 88 लक्ष रुपयांच्या निधी शासनाकडून मंजूर करून आणलेला आहे व त्याचे आज शुभारंभ करण्यात येत आहे धुळे शहरातील चारी बाजूचे प्रवेश करणारे रस्त्यांचे काम आ.फारुख शाह यांनी केले आहे शहरातील प्रमुख रस्ते जसे पारोळ रोड ते प्रकाश टाकी गुरुद्वारा ते संतोषी माता मंदिर पर्यंत तसेच साक्री रस्त्याच्या कामासाठी आ.फारुख शाह यांनी करोडो रुपयांच्या निधी आणून काम केलेले आहे या कार्यक्रमाला आ.फारुख शाह यांचे सोबतडॉ. दीपश्री नाईक,अनिस शाह,प्यारेलाल पिंजारी,राज चव्हाण,सायं.दै श्रम राज्य चे अतुल पाटील, दै.मर्डर चे राजू गर्दे,दै. खान्देश मैदान चे मनोज गर्दे,दै.नवराज्य चे सुनिल पाटील,दादाड खताळ,अनिल बगदे,उमेश बाबर,गणेश सुपनर,प्रविण खताळ,मिलिंद टेंभेकर,दिनेश गायकवाड,डॉ.बापुराव पवार,डॉ.शराफत अली,राजू पिंजारी,गंभीर मोरे,बिपिन अमृतकर,भिका भोकरे,राजाराम वारुळे,मधुकर सुर्यवंशी,जगन्नाथ ब्राह्मणे,रवींद्र अहिरे,जितू पवार,पवन अहिरे,कृष्णा आहिरे,दत्तू शिंपी,राकेश सुर्यवंशी,राजेश शिरसाठ, इकबाल शाह,निसार शाह,आसिफ शाह पोपट,आनंद सैंदाणे,सउद आलम,ज्ञानेश्वर पवार,सरदार सउद,हारून खाटीक,रियाज शाह,समीर शाह,माजीद पठाण, आदी उपस्थित होते.


Social Plugin