धुळे :- बदलापुर जि. ठाणे येथे गेल्या 9 ऑगस्ट रोजी शालेय बालीकेवर झालेल्या अत्याचारा विरोधात तीव्र निषेध करण्यासाठी तसेच त्यातील बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यासाठी आज भाजपा धुळे महानगर शाखेच्या वतीने मा. केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे व मा. आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वात झांसी राणी चौक धुळे येथे तीव्र आंदोलन करण्यात येवून आरोपीला फाशी झालीच पाहिजे. परंतु यासाठी या गंभीर आणि लाछंनास्पद विषयावर कुठल्याळी राजकीय पक्षांनी स्वत:च्या स्वार्थासाठी राजकारण न करता सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आणि पिढीता व त्यांच्या परिवारा सोबत सहानुभुतीने सर्व पक्षांनी उभे राहुन राज्य सरकारला बलात्काऱ्यांना कडक शासन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. अशी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजपा धुळे महानगर विधानसभा संयोजक अनुप अग्रवाल, मा. महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, जयश्रीताई अहिरराव, डॉ. माधुरी बोरसे, जिल्हा महामंत्री ओमप्रकाश खंडेलवाल, संदीप बैसाणे, ज्येष्ठ नेते भिमसिंग राजपुत, महेश मुळे, विजय पाच्छापुरकर, देवेंद्र सोनार, जिल्हा प्रवक्ते पृथ्वीराज पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ, भाजपा सोशल मिडीया संयोजक पवन जाजु, सुनिल कपील, प्रकाश उबाळे, शेखर कुलकर्णी, बिपीनचंद्र रोकडे, मनिषा ठाकुर, शंकुतला जाधव, उमा कोळवले, वंदना थोरात, वंदना सुर्यवंशी, सुलोचना चौधरी, मोहिनी धात्रक, सुनिता सोनार, आरती पवा, निषा चौबे, रंजना पाटील, मिनल अग्रवाल, पुनम सिंह, आरती दिलीप महाले, तुषार भागवत, भुषण गवळी, पंकज धात्रक, गोपाल ईश्वर चौधरी, प्रकाश पाटील, जयवंत वानखेडकर, अमोल मासुळे, सुहास अंपळकर, प्रथमेश गांधी, सुलोचना चौधरी, पत्रकार राजेंद्र सोनार, सागर कोडगीर, प्रशांत बागुल, योगिता बागुल, राजेश पवार, अरुण पवार, सुबोध पाटील, भिलेश खेडकर, भगवान देवरे, किरण चौधरी, जिवन शेंडगे, कमलाकर पाटील, शिवाजीराव काकडे, अनिल थोरात, योगेश मुकुंदे, आनंदा चौधरी, इत्यादी मान्यवरांसह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, व लोकप्रतिनीधी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


Social Plugin