जळगाव - एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे यंदाही २ ऑगस्ट रोजी संत नामदेव महाराज यांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले होते. सकाळी १० वाजता सुभाष चौकातील श्री महालक्ष्मी मंदिर येथून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संतांच्या पालखीचे पुजन अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्था उपाध्यक्ष श्री शिवाजीराव शिंपी व उद्योग आघाडी उपप्रमुख दिपक निकुंभ यांचे हस्ते सपत्नीक झाले. श्री महालक्ष्मी पूजन समाजाध्यक्ष चंद्रकांत जगताप यांचे हस्ते सपत्नीक करण्यात आले. त्यानंतर संतांच्या मिरवणुकीस सुरुवात होऊन मिरवणूक सुभाष चौक मार्गे सराफ बाजार,रथचौक येथून बालाजी मंदिर देवस्थान येथे समारोप करण्यात आला. यावेळी मिरवणुकीच्या अग्रभागी सजविलेल्या बग्गीवर संत नामदेव महाराज यांची प्रतिमा आरूढ करण्यात आली होती नंतर संताची पालखी होती ठिकठिकाणी पालखीचे पुजन करण्यात येत होते. यावेळी महीला मंडळ पदाधिकारी संत नामदेव व विठ्ठल भक्तीचे गजरात हातात टाळ घेऊन भक्ती भावात रंगून नृत्य सादर करीत होत्या, फुगड्या देखील खेळत होत्या, घे भरारी गृपच्या महीला देखील या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या, कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर सिमा भोळे, जयश्री महाजन माजी नगरसेवक अश्विन सोनवणे,अमर जैन समाजसेविका मंगला बारी मुकेश बाविस्कर रेखा कुळकर्णी रुतुजा संत यांची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समाजाध्यक्ष चंद्रकांत जगताप उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे सचिव सुजित जाधव कार्याध्यक्ष किशोर निकुंभ कोषाध्यक्ष प्रशांत कापूरे मार्गदर्शक मोहन सोनवणे श्रीराम सोनवणे सतिश सोनवणे शरद कापडणे यांचेसह महीला अध्यक्ष सारीका शिंपी उपाध्यक्ष भारती निकुंभ सचिव रेखा कापडणे सहसचिव वैशाली जाधव कार्याध्यक्ष मनिषा निकुंभ रजनी शिंपी वंदना जगताप सुनिता शिंपी आशा जाधव प्रमिला सोनवणे करूणा सोनवणे गिंताजली भांडारकर मानसी भांडारकर मनिषा खैरनार इत्यादींनी परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्था सचिव सुजित जाधव यांनी मानले यावेळी १२०० समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


Social Plugin