छत्रपती ग्रुपतर्फे आज आंबेडकर नगर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

 



छत्रपती ग्रुप तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज 30 सप्टेंबर 2024 रोजी जुने जळगाव येथील आंबेडकर नगर येथे सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सर्व आजारांवर तपासणी करून मोफत औषध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 




याबाबत सविस्तर माहिती अशी की,  छत्रपती ग्रुपच्या वतीने नेहमी जळगावं शहरात आरोग्य शिबीर व इतर सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याअनुषंगाने जुने जळगाव येथील आंबेडकर नगर, येथे आज 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते 1 वाजेच्या दरम्यान सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या शिबिरात  जिल्हा शासकीयवै वैद्यकीय महाविद्यालयाचे चिकित्सक डॉक्टर, सहाय्यक स्टाफ उपस्थित राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हाहन छत्रपती ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक सतीश गायकवाड यांनी केले आहे.