जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मानधनात वाढ करण्यात यावे.अशी मागणीसाठी शहरातील जेलरोड येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.निवेदनात म्हटले की, जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स यांना मदतनीस म्हणून अंशकालीन स्त्री परिचर यांची नियुक्ती केली असून अंशकालीन स्त्री परिचर यांना शासनाकडून दर महा तीन हजार रुपये मानधन मिळत असून वाढत्या महागाईमध्ये हे मानधन न परवडणारे असून अंशकालीन स्त्री परिचरला वेठ बिगार सारखे जीवन जगण्याची वेळ आहे .तसेच डिसेंबर २०२३ मध्ये नागपूर अधिवेशनावर अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मानधनात वाढ व्हावी .म्हणून मोर्चाही काढण्यात आला होता. परुंतू ,मायबाप सरकारने अद्यापावेतो मानधन वाढ बाबत दखल घेतली नसून आरोग्य आरोग्य विभागाच्या वतीने मानधन वाढ प्रस्ताव तयार केला. या वाढीव मानधन प्रस्तावाला मान्यता देवून अल्प मानधनावर काम करण्याचा अंशकालीन स्त्री परिचर यांना मानधनात वाढ होवून वेठ बिगारासारखे जीवन जगणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मानधन वाढ करून प्रश्न सोडवा.यासह इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष काँ.वसंत पाटील , जयश्री महाजन , आशा महाजन , सुरेखा बर्डे, अंजना पवार, मंगला बिलकुले, ज्योती देवरे, अनिता रास्त, रेखा जगताप, सुनंदा सावळे, नंदिनी मोरे, अलका गवळी, सुमन सूर्यवंशी, वंदना ठाकरे, वेणु मोरे, सुमन बोरसे, कुसुम कुवर ,ललिता देसाई, आशा ठाकरे,पिरापर्क मालुसरे, ललिता नवले,बेबी वानफील , उज्वला भदाणे, हिरा महाले,अनिता भावे, सुवर्णा भावे, कल्पना ढीगळे,मनीषा कदम , मिना देशमुख,प्राप्ती कुवर,नवल बडे, गिता देसले , आदीसह महिला भगिनी उपस्थित होते.


Social Plugin