भारत आदिवासी पार्टी धुळे ग्रामीण , साक्रीत उमेदवार देणार - आबा आहिरे






आगामी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत धुळे ग्रामीण व साक्री विधानसभा मतदार संघात भारत आदिवासी पार्टीच्या वतीने उमेदवार लढणार  असल्याचे आबा आहीरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे भारत आदिवासी पार्टीतर्फे धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघासाठी डॉ.महेश मोरे , साक्री विधानसभा मतदार संघातून लखन पवार उमेदवारी करणार आहेत.या पत्रकार परिषदेप्रसंगी वल्लभ मालचे ,नाना महाले,डॉ.महेश मोरे,लखन पवार ,हिरामण मालचे,भाऊसाहेब मालचे,प्रल्हाद पवार,समाधान मालचे,सुनिल गायकवाड ,आदीसह उपस्थित होते.