स्वातंत्र्यानंतर प्रथमच अन्वर नालावरील आदिवासी वस्तीत विकास कामांचे शुभारंभ



ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत पहिल्यांदा मनपा हद्दीत विकास कामे- आ. शाह 





धुळे - ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत आदिवासी वस्ती येथील रस्ते गटार करणे या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या शुभहस्ते संपन्न झाले स्वातंत्र काळापासून सुमारे 70 वर्षापासून धुळे शहरातील आजूबाजूच्या आदिवासींमध्ये विकासाचे काम झालेले नव्हते आ.फारुख शाह यांनी धुळे शहराच्या विकासाकांमध्ये सर्व समाजातील व सर्व वंचित घटकांसाठी आदिवासी दलित वस्ती व ज्या भागात मूलभूत सुविधा नव्हत्या त्या भागात पर्यंत विकासाची गंगा घेऊन गेलेले आहेत. या आदिवासीं वस्तीमध्ये ना रस्ते होते ना गटार होते ती परिस्थिती बघून आ.फारुख शाह  यांनी आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा सुरू केला त्यामुळे ग्रामीण भागात असलेली ठक्कर बाप्पा योजना शहरासाठी विशेषतः महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आणि तसा दुरुस्तीचा शासन निर्णय काढण्यात आला.अशा पद्धतीने  आजपर्यंत कोणत्या आमदारांनी केलेले नाही ते काम ठक्कर बाप्पा आदिवासी योजना अंतर्गत शासनाला शहरी भागात आदिवासी वस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊन एक क्रांतिकारी कामाची सुरुवात केलेली आहे.ठक्कर बापा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत फक्त ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध होत होता परंतु आ.फारुख शाह यांनी शहरी भागासाठी सुद्धा हे निधी खेचून आणलेला आहे या ठक्करबाप्पा आदिवासी सुधार योजनेअंतर्गत पिंपरी शिवार जय मल्हार नगर तसेच जमनागिरी भिलाटी या भागात करोडो रुपयांचे काम होणार असून त्याची आज सुरुवात आ.फारुख शाह  यांनी केलेली आहे. या भागातील आदिवासी बंधूंनी आणि भगिनींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आम्हाला संपूर्ण विकास कामांमध्ये कोणत्या आमदारांनी  सहकार्य केले नाही परंतु आ.फारुख शाह यांनी वचन न देता आमचे काम करून दिलेले आहे व येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून व त्यांना निवडून देऊ या भागात आजपर्यंत न रस्ते होते ना गटार होते परंतु आमदार फारुक शहा यांनी आदिवासी वस्तीच्या विचार करता या भागासाठी निधी आणला त्यासाठी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला मोहन मोरे ,किशोर मोरे,करण ठाकरे,परशुराम पवार,इंदल सोनवणे,संतोष ठाकरे, राहुल गायकवाड,अर्जुन अहिरे,किरण सोनवणे,बादल सोनवणे,विजय गायकवाड,हिराबाई सोनवणे,विमलबाई ठाकरे,शकुंतला मोरे, यमुबाई जाधव,आमीर पठाण मौलाना शकील छोटू मच्छी वाले साजिद साई,प्यारेलाल पिंजारी,निजाम सैयद, डॉ.बापूराव पवार डॉ. दीपश्री नाईक फैसल अन्सारी हारुण खाटीक मालिका खाटीक पिंजारी साजिद शाह परवेज शाह आसिफ शाह समीर शाह,शाबान शाह,सुलतान शेख,रफिक शाह आदी उपस्थित होते.