जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्याबद्दल मतदार संघात प्रचंड सहानुभूतीचे वातावरण तयार झाले आहे. प्रचार रॅलीदरम्यान विशेषतः धरणगाव तालुक्याने तर मोठे औदार्य दाखवत त्यांच्यासाठी लोकवर्गणी जमा करण्याचा नवा पायंडा यंदाच्या निवडणुकीत पाडला आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा देखील आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना गावागावातील मतदारांकडून तन, मन आणि धनाने पाठिंबा मिळू लागला आहे. धनशक्ती विरूद्ध जनशक्तीच्या या लढ्यात धरणगाव तालुक्यातील बिलखेडा गावाने सुमारे ५० हजार रूपये लोकवर्गणी जमा करून त्याची सुरूवात केली. त्यानंतर धरणगाव तालुक्यातीलच चमगाव आणि अहिरे या गावांनी ‘हम भी किसी से कम’ नसल्याचे दाखवून दिले आहे. चमगावने ५१ हजार रूपये तसेच अहिरे गावाने २६ हजार रूपयांची लोकवर्गणी सोपविल्यानंतर भारावलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपल्यासाठी ही मदत लाख मोलाची असल्याची भावना व्यक्त केली.

Social Plugin