विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या ८ नोव्हेंबर रोजी धुळ्यातील खान्देश गौशाळा मैदानावर जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे , अशी माहिती महायुतीचे धुळे शहर मतदार संघातील उमेदवार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. आठ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता खान्देश गोशाळा मैदान येथे ही सभा होईल. सत्तर हजार नागरिकांची बैठक व्यवस्था असलेला भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.खान्देश गौशाळा मैदानावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी भाजपाचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्या समवेत माजी खा.डॉ.सुभाष भामरे , माजी आ. राजवर्धन कदमबांडे,धुळे ग्रामीण मधील भाजपाचे उमेदवार राम भदाणे , गजेंद्र अंपळकर ,चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्फ,अरविंद जाधव,हिरामण गवळी, शितलकुमार नवले ,जयश्री अहिरराव,प्रतिभा चौधरी , अल्पा अग्रवाल ,आदी उपस्थित होते.यावेळी पुढील माहिती देताना अनुप अग्रवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न भूतो न भविष्यती अशी सभा धुळ्यात होणार आहे.सभामंडपात पत्रकार व्हीआयपी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष राहणार आहे.फिरते रुग्णालय ,रुग्णवाहिका , डॉक्टर्स, तत्पर ठेवण्यात येणार आहे.या सभेसाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार,भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहा विधानसभा मतदार संघातील उमेदवार व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Social Plugin