शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप बेडसे यांच्या प्रचारार्थ नरडाणा येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली .या सभेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले की,या नरडाणा येथे मी लहानपणापासून यायचो. तत्वाने वागणारे स्व.भाऊसाहेब सिसोदिया आणि स्व.राजाराम बापू यांचे जुने संबंध होते.गेल्या वीस वर्ष सातत्याने तुम्ही ज्यांना निवडून देत आहेत. त्यांच्याकडून विकासाची एक वीटही रचली गेली नसेल, तर आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे .या मतदारसंघात प्रश्नच जास्त असून स्थानिक नेतृत्वाने सोडवण्यासाठी तत्पर राहिला असता, मात्र शिंदखेडा मतदारसंघात फक्त हुकूमशाही, दादागिरी, खोटे केसी , भ्रष्टाचार असे करण्यासाठी हे महाशय निवडून येतात. बेरोजगार युवकांचा हाताला काम नाही, महागाई शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. फक्त विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला वेठीस धरतात.हे भाजपा सरकार फक्त दिशाभूल करते.हा सुपीक प्रदेश आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक जलसिंचनाच्या योजनांना आम्ही कार्यान्वित केले. आता या योजना रेंगाळल्या आहेत. एमआयडीसी मध्ये गुंडगिरी वाढली आहे. त्यामुळे नवीन उद्योग धंदे येत नाही.सुमारे ६५०० हेक्टरवर ग्रोथ सेंटरची स्थापना केली होती.या जमिनीचा मोबदला लोकांना मिळालेला नाही.ही परिस्थिती आहे.बदल घडविण्यासाठी डॉ. हेमंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नेते एक झाले आहेत.यांची जाणीव होताच एकाला रसद पुरवून निवडणुकीत उभे केले आहे.मात्र आपल्या एकिपुढे त्यांचा टिकाव लागणार नाही पुढील आठ दिवसात समोरच्या बाजूने प्रचंड दबाव निर्माण केला जाईल.मात्र भावनिक होऊन मते देऊ नका.आमच्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना, शेतकऱ्यांचे दोन लाखांवरून तीन लाख रुपयांचा खर्च माफ करणार , जो नियमित शेतकऱ्यांला ५० टक्के सूट देणार,घरातील परिवारासाठी २५ लाखाचा विमा संरक्षण देणार, महिलांना एसटी बसमध्ये मोफत प्रवास उपलब्ध करून देणार, शेतकऱ्यांना रोज बारा तास वीज देणार यासह इतर योजना आम्ही राबवणार आहे.म्हणून उमेदवार संदीपदादांना निवडून देत आपल्या मतदार संघाच्या विकासाचा मार्ग खुला करा .असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.यावेळी पक्ष निरीक्षक उमेश पाटील,माजी मंत्री हेमंत देशमुख , एन.सी पाटील, ज्ञानेश्वर भामरे,उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे ,कामराज निकम,जुई देशमुख,आपचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार, काँग्रेस पक्षाचे नेते दीपक अहिरे,माजी महापौर कल्पना महाले, शहराध्यक्ष रणजित भोसले, जोशब मलबारी ,प्रफुल्ल शिसोदे, शानाभाऊ सोनवणे,रामभाऊ माणिक,उपेंद्र धनगर, त्र्यंबक पदमोर,भालचंद्र कानुगो,डॉ.सुभाष लांडे, राजू देसले,पोपटराव सोनवणे,ललित वारुळे ,जितेंद्र शिसोदे,मनीषा शिसोदे, नितीन चौधरी,महेंद्र निकम , जितेंद्र मराठे,रवींद्र देशमुख,उषाताई पाटील, लिलावती बेडसे,राकेश पाटील,गिरीष देसले ,प्रमोद शिसोदे, अरुण देसले,महेंद्र पाटील, रतिलाल पाटील, दयाराम कुंवर,गिरधारी रामरख्या,अमित शेख , इंद्रीस कुरेशी,अरुण देसले, रतिलाल पाटील,दयाराम कुंवर ,कैलास ठाकरे, कमलाकर बागले,आदी उपस्थित होते.या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित नरडाणा ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Social Plugin