मुंबई येथील संदीप फाऊंडेशनच्या शारदा नेत्रालयाची स्थापना होवून वीस वर्ष पूर्ण झाले आहे असून नेत्ररुग्णसेवेच्या एकविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. आतापर्यंत एक लाख पंधरा हजार डोळ्यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. ऑक्टोंबर २०२४ पर्यंत सात लाख चौतीस हजार नेत्ररुग्णांची तपासणी व उपचार केले. खान्देशात नव्हे तर महाराष्ट्रात नेत्रसेवेत शारदा नेत्रालय अग्रेसर आहे.अशी माहिती शारदा नेत्रालयातील श्रीपाल मुणोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नकाणे रोड परिसरातील शारदा नेत्रालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी देवेंद्र शहा,डॉ. प्रविण शहा, दीपक मेहता ,राजेंद्र चौधरी ,डॉ. मुबाशीर अन्वर,डॉ.पराग बागड,देवेंद्र शहा उपस्थित होते.या वेळी पुढे बोलतांना मुणोत म्हणाले की , गुजरात राज्यातील कच्छ येथे जयंत शहा नेत्र तपासणी शिबीर घेत होते.भूकंप आल्यानंतर नेत्र तपासणी शिबिरात सातत्य राखण्यासाठी धुळ्यात पहिले शिबीर गणपती रोडवरील अंध शाळेत घेतले.त्यावेळी महिन्याला. केवळ चार डोळ्यांचे ऑपरेशनवरून झालेली सुरुवात आज लाखाच्या पुढे पोहचली आहे.त्यातील पन्नास टक्के ऑपरेशन्स हे मोफत केलं जातात.संदीप फाऊंडेशनचे डोळ्यांवर उपचार करणारी कमलिनी वाणी शारदा नेत्रालय ही एकमेव शाखा आहे. शारदा नेत्रालय अंतर्गत २०१६ पासून नेत्रतंत्रज्ञ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. २०२३ पासून नेर येथे व्हिजन सेंटर कार्यरत करण्यात आले आहे.मोबाईल, लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणावर होवू लागल्याने त्याचा डोळ्यांवर भयंकर परिणाम दिसून येतो.मधुमेहाच्या रुग्णांनी डोळे वारंवार तपासले पाहिजेत. अन्यथा डोळ्याचा पडदा निकामी होण्याची शक्यता आहे. रुग्णांच्या शारीरिक औषध आवश्यकतेनुसार लेन्स टाकण्यात येत असल्याचेही डॉ. मुबाशीर अन्वर , डॉ पराग बागड या तज्ञांनी स्पष्ट केले.


Social Plugin