जळगावं प्रतिनिधी.
जळगाव शहर विधानभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ललितकुमार रामकिशोर घोगले यांच्या प्रचारार्थ वंचीत आघाडीचे मुस्लिम युवा स्टार प्रचारक मोहम्मद तय्यब जफर यांच्या आज 12 नोव्हेबर 2024 रोजी शहरात दोन ठिकाणी कॉर्नर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दुपारी 3 वाजता पिंप्राळा हुडको येथील आझाद नगर येथे तर रात्री 8 वाजता मास्टर कॉलनी येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोघ सभांना वंचीत आघाडीचे मुस्लिम युवा स्टार प्रचारक मोहम्मद तय्यब जफर हे संबोधित करणार असल्याची माहिती वंचित आघाडीचे उमेदवार ललित घोगले यांनी दिली आहे. दरम्यान तमाम दलित, हिंदू, मुस्लिम बांधवानी या सभेस उपस्थित राहावे असे आव्हाहन जळगाव शहर वंचित आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.


Social Plugin