धुळे : विधानसभा वंचित बहुजन आघाडी उमेदवार जितेंद्र शिरसाठ यांच्या विजया साठी दिवसेंदिवस अनेक समाजातर्फे अनेक संघटनेतर्फे पाठिंबा देण्यात येत आहेत व मोठा प्रतिसाद देखील पाहण्यास मिळत आहे. त्याच प्रमाणे आज धुळ्यातील मेहतर समाजातर्फे देखील वंचित आघाडीचे जितेंद्र शिरसाठ यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यात आला. ह्या ठिकाणी मेहतर समाजाच्या काही वरिष्ठान्नी सांगितले कि आम्ही अनेक दिवसापासून जितू शिरसाठ यांच्या कडे अनेक समाजाचे स्वतः येऊन मोठ्या प्रमाणावर पाठिंबा पाहायला मिळतोय आणि अनेक वर्षांपासून आम्ही पाहत आहोत ह्या ठिकाणी सर्व धर्म समभाव सोबत घेऊन काम करतात म्हणून यांचा विजय देखील निश्चित दिसतोय म्हणून जेव्हा यांना उमेदवारी तिकीट निश्चित झाले तेव्हाच आम्ही यांना विजयी घोषित केल तरी आमचं मत इतर ठिकाणी वाया न जाऊ देता आमच्या पूर्ण समाजाचे मत जितेंद्र शिरसाठ यांना देऊ असे आश्वासन दिले.

Social Plugin