इंदिरा गार्डन, देवपूर येथे महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढत समाजवादी पार्टीचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार इर्शाद जहागिरदार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
एकंदरीत ह्या धुळे शहराचे राजकारण बघता अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण होत आहे. कुणी धर्माच्या नावावर कुणी खालच्या भाषेत वयक्तिक टीकाटिपणी करीत आहे, ह्या सगळ्यात विकासाची व्याख्या काय असते हे जनतेसमोर एकमेव उमेदवार इर्शाद जहागिरदार हेच मांडत आहेत आणि कुणावर टीका करण्यापेक्षा धुळेकर जनतेच्या आयुष्यात कसा बदल घडवून आणता येईल याबाबतचे त्यांचे असलेले व्हिजन लोकांसमोर मांडून निवडणूक लढवीत आहेत.
रस्ते, गटार, लाईट, स्वच्छता ह्या गोष्टी विकासात येत नाहीत तर त्या लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीत येतात आणि विकास म्हणजे चांगली शिक्षण व्यवस्था, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी उद्योग आणणे, इथल्या मुलाबाळांना विरंगुळा करण्यासाठी शहरात एकही गार्डन उपलब्ध नाही इथल्या युवती महिला यांना सुट्टीच्या दिवशी वेळ झाला घालवता येईल असे एखादे ठिकाण नाही. अश्या असंख्य लोकपयोगी कामांपासून धुळे शहर अनेक वर्षांपासून वंचित आहे. इथल्या तरुणांना नाहक चुकीच्या व्यवसायांमध्ये अडकवून ठेवले जाते आणि त्यांच्या भविष्याची परवा न करता फक्त वापर केला जातो ही दयनीय अवस्था धुळे शहराची आहे. सरकारी शाळांमध्ये भेटणारे शिक्षण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे, जी मुले धुळे शहरात म्हणून काही शिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी अद्यावत अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करणे, आरोग्य सुविधा ह्या अद्यावत भेटल्या पाहिजेत यासाठीच मी उमेदवारी करीत आहे असे आपलं मनोगत व्यक्त करताना इर्शाद जहागिरदार यांनी सांगितले.
यावेळी इंदिरा गार्डन परिसरातील नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित इर्शाद जहागिरदार, कैलास भाऊ चौधरी, पप्पू भैय्या मसालेवाले, महेंद्र शिरसाठ, निखिल पाटील, शामकांत मोरे, गीतांजली जाधव, आयुष काकडे, राज चौधरी, पिंटू चौधरी, तेजस रणसिंग, संतोष केदार, गणेश धुळेकर, अभिजीत देवरे, राहुल पोळ, मोहसीन पठाण, स्वप्निल पोळ, रोहन पोळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social Plugin