ही निवडणूक धर्माची नसून विकासाची आहे - इर्शाद जहागीरदार



 काल दि.७ रोजी जनता सोसायटी हजरत अली मस्जिद जवळ महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढतीचे समाजवादी पक्षाचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा. इर्शाद जहागिरदार यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.




ही निवडणूक धर्माची नसून विकासाची आहे इथल्या बेरोजगार युवकांच्या भविष्याची आहे, मुला-मुलींना चांगली शिक्षण व्यवस्था उभी करण्यासाठी आहे, आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आहे, हे शहर स्वच्छ सुंदर नीटनेटके करण्यासाठी आहे गेल्या 30 वर्षापासून हे शहर शैक्षणिक औद्योगिक उद्योजक क्षेत्र सगळ्या बाबतीत बॅकफूटवर आहे ती भर काढण्याची नितांत गरज आहे आणि ही भर काढण्यासाठी इर्शाद भाई जहागिरदार यांच्यासारख्या उच्चशिक्षित माणसाला विधानसभेत पाठवण्याची गरज आहे असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी केले.


सदर कॉर्नर सभेस परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता व येणाऱ्या निवडणुकीत इर्शाद भाई जहागिरदार यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आश्वासन दिले.


सदर बैठकीचे आयोजन हे अकील अहमद, अब्दुल अहद, कशिफ अन्सारी, आबिद अन्सारी यांनी केले होते.


यावेळी उपस्थित इर्शाद भाई जहागिरदार, हाजी इकबाल वस्ताद, अमिन पटेल, पप्पू भैय्या मसालेवाले, गुड्डू काकर, इनाम सिद्दीकी, इम्रान खान, महमूद भाईजान, अकील अन्सारी, शहीद अन्सारी गुलाम कुरेशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.