मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : चारठाणा येथील भवानी माता मंदिर परिसराचा आ.एकनाथराव खडसे यांनी इको टुरिझम व इतर योजना अंतर्गत विकास केला त्यामुळे भाविकांना, पर्यटकांना सभागृह, विश्रामगृह, वन उद्यान, तलावात बोटिंग इत्यादी सोयी सुविधा मिळाल्या. नाथाभाऊंची विकासाची परंपरा रोहिणीताई पुढे नेतील. म्हणून परिसरातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन बाळा सोनवणे यांनी ग्रामस्थांना केले.
मुक्ताईनगर मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड, मधापूरी, चारठाणा येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत असतांना बाळा सोनवणे मतदारांशी संवाद साधत होते.
ते पुढे म्हणाले की, कोथळी येथील मुक्ताई मंदीर परिसर, चारठाणा येथील भवानी माता मंदिर परिसर यांचा नाथाभाऊंनी ज्याप्रमाणे विकास केला त्याप्रमाणे भविष्यात रोहिणी खडसे सुद्धा या ठिकाणाचा अधिक विकास करून परिसरातील पर्यटन वाढीस चालना देतील. पर्यटकांची संख्या वाढल्यास, त्यातून अनेकविध व्यवसायांची निर्मिती होवून परिसरातील तरुणांना रोजगार मिळेल. आपल्या मुलाबाळांना इथेच आपल्या मातीतच रोजगार मिळावा यासाठी रोहिणी खडसे यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शारदा खडसे चौधरी यांच्यासह ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Social Plugin