धुळे शहराच्या विकासासाठी एक नवीन चेहरा म्हणून इर्शाद जहागिरदार यांनी समाजवादी पार्टीकडून निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्यामुळे शहराच्या विकासासाठी एक नवा दृष्टिकोन आवश्यक आहे, असे त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
इर्शाद जहागिरदार यांचे शिक्षण विदेशी स्तरावर न्यूझीलंडमध्ये एम.एस्सी. अॅग्री. आणि युनायटेड किंगडममध्ये मास्टर इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन यामध्ये झाले आहे. तसेच, हार्वर्ड विद्यापीठातून लोकशाही व राजकीय अभ्यासाचा गाढा अभ्यास करून, ते उच्च शिक्षण घेऊन आले आहेत. त्यांच्या मतदारसंघात निवडून आल्यास विधानसभेत सर्वात उच्च शिक्षित आमदार होण्याची संधी त्यांना मिळेल.
गेल्या 16 वर्षांपासून धुळे शहरात वास्तव्यात असलेल्या जहागिरदार यांनी शहरातील विविध समाजोपयोगी कार्य केले आहे. त्यात प्रमुखतः 250 बोअरवेल्स (मंदिर, मस्जिद, बुद्ध विहार, चर्च), 3000 मुलांना वह्यांचे वाटप, कोरोनाकाळात 5000 कुटुंबांना किराणा किट्स, मोफत औषधांचे वितरण, नेत्ररोग शिबिरात मोफत चष्मे वाटप, तसेच खेळाडूंना खेळ किट्सचे वाटप या उपक्रमांचा समावेश आहे.
"धुळेच्या नागरिकांना आता जाती-पातीच्या राजकारणापासून सावध राहून विकासाच्या दिशेने विचार करणे गरजेचे आहे," असे जहागिरदार यांनी ठामपणे सांगितले.

Social Plugin