जगातील सर्वोत्तम भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे वक्तव्य देशाच्या कायदेमंडळाच्या अधिवेशनातदि.१७ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा. किंवा त्यांनी राजीनामा न दिल्यास, त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून तत्काळ हाकलपट्टी करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन "पुरोगामी विचार मंच धुळे जिल्हा" आणि समविचारी संघटनेच्या विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, माननीय महामहीम भारताचे राष्ट्रपती आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना दि.२० डिसेंबर २०२४ रोजी धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. देशाच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या कायदेमंडळात केलेल्या भाषणामुळे देशातील शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडण्यास मोठा वाव मिळालेला आहे. ज्या भारतीय राज्यघटनेच्या संविधानाची शपथ घेऊनच मंत्रीपद ग्रहण करता येतं, ज्या संविधानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे नतमस्तक होत असतात, मी मागासवर्गीय असून देखील याच संविधानामुळे मी भारत देशाचा प्रधानमंत्री होऊ शकलो, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे नेहमीच नमूद करत असतात. त्याच संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या तत्त्वांची आणि त्याच्या मूल्यांची पायमल्ली देशाच्या गृहमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाच्या कलमाखाली कारवाई करण्यात यावी. देशाच्या जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारे, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे वक्तव्य दस्तूर खुद्द देशाच्या कायदेमंडळात करावे ही अत्यंत खेदाची आणि निषेधार्य बाब आहे. त्यामुळे मागासवर्गीय आणि आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे देशाच्या केंद्रीय गृहमंत्री पदावरून आणि मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व जेष्ठ समाजसेवकांनी सदरचा घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. अश्या अशायाचे निवेदन, पुरोगामी विचार मंच धुळे जिल्हा आणि सम विचारसरणीचे ज्येष्ठ समाजसेवकांच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून भारताचे महामहीम राष्ट्रपतीजी आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक अण्णासाहेब हरिश्चंद्रजी लोंढे, प्राध्यापक बाबा हातेकर, दीपकुमार साळवे, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, श्रीमती नाजनीम शेख, बबन वानखेडे, मनोहर मोहिते, किशोर शेजवळ, सुप्रसिद्ध विधीज्ञ अँड. विशाल साळवे, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड पोपटराव चौधरी, रामकृष्ण शिंदे, गौतम मालचे, राजसाहेब चव्हाण, जमील मन्सुरी, अश्फाक पिंजारी, पत्रकार छोटूभाऊ मोरे आदी उपस्थित होते.


Social Plugin