धुळ्यात ‘हर फर्द हज उमराह’ महोत्सवाची घोषणा, अब्दुल हफिक यांची पत्रकार परिषदेत माहिती

 




धुळे शहरात २९ जानेवारी २०२५ रोजी ‘हर फर्द हज उमराह’ या ऐतिहासिक आणि विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. वडजाई रोडवरील मुस्लिम कब्रस्तानजवळ हा कार्यक्रम होणार आहे.



कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी मक्का-मदिना येथे हज आणि उमराह करण्याचा योग मिळवून देणे आहे. या उपक्रमाद्वारे धार्मिक तसेच सामाजिक जागरूकता निर्माण केली जाईल. कार्यक्रमाचे नेतृत्व सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अब्दुल हफीज साहेब करणार आहेत.


कार्यक्रमात हज आणि उमराहसंदर्भातील महत्त्वाच्या माहितीची देवाण-घेवाण होईल. तसेच हजसाठी निधी जमवताना होणाऱ्या फसवणुकीपासून कसे वाचावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. १४० दिवसांच्या सहज हप्त्यांद्वारे सामान्यांना उमराह करणे सुलभ बनवण्याची योजना जाहीर केली जाईल. याशिवाय उमराह पूर्ण केलेल्या लोकांचे अनुभव, सऊदी टुरिझम अधिकाऱ्यांची उपस्थिती, आणि तीन भाग्यवान विजेत्यांना मोफत उमराहची संधी देणारा लकी ड्रॉ असे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असतील.

सर्व सहभागींसाठी विशेष भोजन आणि सुविधा देण्यात येणार असून हजारो लोकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे. धुळ्यातील जनतेने या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

यावेळी अब्दुल हाफिज, आयुब आमिन, हाजी सईदअहमद, निजाम सय्यद हे उपस्थित होते