७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व-सांध्या शुक्रवार पासून पाळधी तालुका धरणगाव येथील २२ आगग्रस्त दुकानदारांनी आपल्या कुटुंबिया सहित साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. सोमवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता.
आपत्ती व्यवस्थापन मंत्र्याच्या कार्यालया समोर उपोषण परंतु अद्याप दखल नाही
योगायोग म्हणजे पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणाला परवानगी नाकारली असून जी एस ग्राउंड वर उपोषणाची परवानगी दिली नाही त्यामुळे उपोषणकरते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर मंडप टाकून उपोषणाला सुरुवात केलेली आहे परंतु दुर्दैव उपोषणकर्त्यांचे घोषणांचे आवाज आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा महाराष्ट्राचे संकट मोचक यांच्या कानापर्यंत पोहोचलेली नाही.
दोन मागण्यासाठी उपोषण
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अनुसार २२ दुकानदारांना ज्यांचे महसूल पंचनामे होऊन २६ दिवस झाले तरी अद्याप नुकसान भरपाई दिलेली नाही ती त्वरित देण्यात यावी व जे आरोपींची नावे पोलिसांनी उघडकीस आणलेले आहे त्या आरोपींना अद्याप अटक झालेली नसून सदर आरोपी पाळधी गावात फिरत आहे या दोन मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील.
*लवकरच बेमुदत उपोषण*
नियमानुसार उपोषणकर्त्यांनी साखळी उपोषणाची नोटीस दिली त्यावरही जर सात दिवसात कारवाई न झाल्यास येणाऱ्या तीन दिवसानंतर सदर उपोषणाला आमरण उपोषण मध्ये बदल करण्यात येईल असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलेले आहे.
*उपोषण स्थळी यांनी भेटी घेऊन पाठिंबा दर्शविला*
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील व एडवोकेट संजय पाटील, डॉक्टर व्ही बी पाटील, गोवर्धन भीमदास सौदी, राजेंद्र पाटील, दशरथ भिला पाटील, दत्तात्रय बाळकृष्ण कुलकर्णी, सारिका राकेश परदेशी, सुमित्र अहिरे, रवींद्र बाविस्कर, खुशाल पंडित सोनवणे, सुनील साळवे, सुनील देहाडे, काँग्रेस भुसावळचे मुनव्वर खान , गवळी समाजाचे सलीम गावली व हमीदा गवळी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मजहर खान, अजित पवार गटाचे नदीम मलिक, समाजवादी
पक्षाचे रईस बागवान, प्रहार संघटनेचे युसूफ खान, काँग्रेस महानगर अध्यक्ष अमजद पठाण, डॉक्टर शाकीर जमील, एरंडोल चे नगरसेवक अस्लम पिंजारी व अब्दुल रहीम, जामनेर चे अश्फाक पटेल, फैजपूरचे कुर्बान शेख ,भुसावळचे साबीर मेंबर, टिपू सुलतान चे मुस्ताक पिंजारी, कुल जमातीचे सय्यद चांद,
महिलांमध्ये प्रामुख्याने शहनाज बी शेख ,अंजुम जावेद पिंजारी, परझाना सलीम पिंजारी, शाहीन बी शेख शकील, परविन तनवीर शाह,तायरा शेख नसीर, महेरुंनिसा शेख, परविन शहा, तरन्नुम सहिल पिंजारी, शहनाज बी, या तीन दिवसात सुमारे ५७५ लोकांनी स्वाक्षरी करून आपला पाठिंबा या साखळी उपोषणाला दर्शविलेला आहे.

Social Plugin