ना.दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली विविध पदाधिकाऱ्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश.








शहरातील मनभावन हॉटेल येथे शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिलदादा दामोदर यांच्यासह जिल्ह्यातून विविध संघटना व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दादा भुसे, शिवसेना राज्य सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी  यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश केला आहे.यावेळी सहसंपर्क प्रमुख विशाल देसले ,जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावीत, सतिष महाले,माजी नगरसेवक राजेंद्र महाले, कन्हैया चौधरी,योगेश मराठे  आदीसह उपस्थित होते.