धुळे - शहरातील ८० फुटी रोडवरील माधव कॉलनी येथे सुधाकर दादा बेंद्रे यांच्या निवासस्थानी गणेश जयंती निमित्त गणपतीची महाआरती करण्यात आली.
गेल्या ४५ वर्षांपासून श्री गणेशाची सेवाकरित आहे. गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. यात मुर्तीची अभिषेक, होम हवन,पुर्णाहाऊती यासह इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच श्री. गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिक उपस्थित असतात. यावेळी सुधाकर बेंद्रे, सागर बेंद्रे, नितीन बेंद्रे,शशिकांत काळे, जयश्री बेंद्रे, दिपाली बेंद्रे, मनिषा शेजळकर, ओम बेंद्रे, भटु बेंद्रे, आबा गुरुजी, दिनेश भंडारी गुरुजी, सचिन जोशी गुरुजी,मनोज कुलकर्णी गुरुजी आदीसह उपस्थित होते.


Social Plugin