माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांच्यावतीने अभिवादन. रमाई महिला मंचातर्फे कार्यक्रम संपन्न.





माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री ना.जयकुमार रावल ,आ.राम भदाणे,यांच्याहस्ते माता रमाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमातून माता रमाई यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

देवपुरातील जिल्हा क्रीडा संकुलनाजवळ माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्या माध्यमातून रमाई महिला मंचातर्फे कार्यक्रम झाला. यावेळी शांतीकमल बैसाणे, कोमल वाघ, रेखा पवार, प्रतिभा तायडे, निर्मला गवळे, तसेच संजय भामरे, देविदास वाघ ,माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे, गोपीचंद पाटील, नरेश चौधरी, गोविंद चौधरी, आदीसह उपस्थित होते. तसेच सायंकाळी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी डीजे चा तालावर आनंद घेतला होता.