राजवाडे संशोधन मंडळाकडून पालिकेच्या भूखंडाचा गैरवापर होत असून बेकायदेशीर वापर थांबवून हा भूखंड परत घ्यावा , महापालिका प्रशासनाने हलगर्जीपणा आणि व संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम केल्यास जे. सी. बी द्वारे बांधकाम पाडण्यात येईल. असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने दिला आहे. या संदर्भात आज महापालिका प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले.या निवेदनाचा आशय असा स्थानिक स्वराज्य संस्थेने १० ऑक्टोंबर २००३ रोजी ठराव (क्र.११५) ६००० स्केअर फूड जागा कुठलाही मोबदला न घेता पंधरा वर्षासाठी राजवाडे संशोधन मंडळास दिली. प्रत्यक्षात त्यास शासनाची मान्यता नव्हती. तरीही ती बेकायदेशीररित्या ताब्यात देण्यात आली. २०१८ ला ही मुदत संपुष्टात आली आहे. तत्पूर्वी २०१६ दरम्यान तत्कालीन नगरसेवकांनी या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारही केली आहे. असे असताना प्रशासनाचे मात्र याकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष झालेले आहे. सन २०१८ त्या बेकायदेशीर निर्णयाची मुदत संपलेली असताना ही त्याकडून सदर जागा अद्याप पालिकेने परत घेतलेली नाही.या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने ही जागा तात्काळ ताब्यात घेवून ती बेकायदेशीर व व्यापारी प्रयोजनार्थ वापर केल्याच्या मोबदल्यात संबंधितांने ही जागा व्यापारी प्रयोजनार्थ वापरल्याने कर आकारणी करावी , दंडात्मक रक्कम वसूल करावी अशी मागणी केली आहे.या जागेवरील बांधकाम त्वरित काढण्यात यावे. पालिका प्रशासनाकडून हलगर्जीपणा व संधीताना पाठीशी घालण्याचे काम सुरू राहिले. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जे. सी.बी द्वारे येथील बांधकाम पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला .या निवेदनावर शशिकांत वाघ, राजूबाबा शिरसाठ , नयना दामोदर, प्रेम अहिरे , व सरला निकम यांची नावे आहेत.


Social Plugin