यावल: फैजपूर नगर परिषद हद्दीत शौचालय व्यवस्थापन व कचरा मुक्त मोहिमेतील गैर व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमी वर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत टाकलेल्या कचऱ्याच्या चौकशीसाठी आणि सार्वजनिक शौचालयांची दुर्दशा लक्षात घेऊन शेख कुर्बान शेख करीम यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
या संदर्भातील प्रस्तावावर २१ एप्रिल २०२५ पासून सकाळी अमल सुरू करण्यात येणार आहे.
शेख कुर्बान शेख करीम हे प्रभारी नगराध्यक्ष असल्याने या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व करतील.
दुसऱ्या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, नगरपरिषद र.फा. भागातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची दैनंदिन साफसफाई व देखरेख योग्य पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे संबंधित ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, कारवाईसाठी नव्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Social Plugin